मी आणि माझा UK टूर


दहा वर्षांनंतर घडून आले असे काही ।
कसे होतात बदल आयुष्यात मनात राही ।।1।।
2009 साली येऊन गेलो आम्ही जेथेे ।
2019 नि आम्हाला परत आणले तेथे ।।2।।
या काळत विचार केला नव्हता परत यायचा कधी ।
हे काय ! लगेच जायचं यांनी सांगितलेच नाही आधी ।।3।।
निश्चित झाल्या शिवाय कसं सांगणार बरं ।
शेवट पर्यंत  फायनल नसत हे पण तेवढंच खरं ।।4।।
घाई गडबड उडाली होती आमची तयारी करताना खूप ।
आमच्या घाईत आम्हाला नाही सांगितलं म्हणून जवळचेच झाले होते चूप ।।5।।
आपल्या घाईत  कुणाला समजावून सांगायला वेळ नव्हता बाई ।
सर्व तयारी करताना खूपच झाली आम्हाला घाई ।।6।।
दिवस उजाडला निघायचा मनात होती जरा हुरहुर ।
सर्व काही ठीक होईल ना जातोय घरापासून खूप दूर ।।7।।
आपल्या देशात कसं आपलं सगळं असते सेट ।
इथे तर मागं पडली वेळ 4 ते 5 तासांनी थेट ।।8।।
आमच्या  लेकीसाठी होते सर्व नविन ।
पण ती सगळी कडे जुळवून घेण्यात आहे प्रवीण ।।9।।
रुळली ती आता थोडं कमी झालं टेन्शन ।
त्याची थोडी होती भीती म्हणून केले मेन्शन ।।10।।

 


Comments