चूक


चूक कुणाची हि सांगायची नाही राहिली वेळ ।
कोरोना नी मांडलाय आता सर्वत्र जगभर खेळ ।।1।।
स्वच्छतेचे महत्व आहे यात खास ।
हात धुवा नाही तर देईल तो त्रास ।।2।।
घरून काम करण्याचा घेऊ नका वेगळा अर्थ ।
डॉक्टर, सरकार च्या प्रयत्नांना करा सार्थ ।।3।।
घरी राहायचं आता कस होणार द्या विचार सोडून ।
विषाणू आला आहे घराबाहेर सर्व सीमा तोडून ।।4।।
माझ्या पुरत न राहून हे आलं आता आपल्यावर ।
घरात राहून,नियम पाळून मात करू या संकटावर ।।5।।


Comments