अशी आलू
टिक्की बघितल्यावर तोंडाला नक्कीच पाणी सुटतं. उपवासाला असे पदार्थ
मिळाले तर घरातला प्रत्येकजण उपवास करेल. चला तर आज उपवासाची सोपी कुरकुरीत
आलू टिक्की कशी करायची बघूया .
साहित्य :
*उपवासाचे पीठ - हे कसे तयार करायचे ते आपण या आधी रेसिपी मध्ये बघितलं आहे त्याची लिंक सोबत देत आहे.
साहित्य :
- १ मोठा बटाटा (आलू)
- १/४ कप दही
- १ चमचा दही
- २ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
- २ चमचे उपवासाचे पीठ *
- २ हिरवी मिरची (आवडीनुसार कमी जास्त करू शकता)
- १/२ छोटा चमचा जिरे
- २ ते ३ चमचे तेल
- १/२ छोटा चमचा साखर
- चिमूटभर जिरेपूड
- मीठ चवीनुसार
*उपवासाचे पीठ - हे कसे तयार करायचे ते आपण या आधी रेसिपी मध्ये बघितलं आहे त्याची लिंक सोबत देत आहे.
कृती :
सर्वप्रथम बटाटा उकडून घ्या. थंड झाला कि किसून घ्या जेणेकरून त्यात गाठी राहणार नाही.
त्यात बारीक चिरून मिरची, शेंगदाण्याचे कूट, १ चमचा दही, उपवासाचे
पीठ, जिरे, मीठ टाकून चांगले एकजीव करा.
तव्यावर १ ते २ चमचे तेल टाका. आता
तयार गोळ्याचे थोडे हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे बनवून त्याला टिक्कीचा
आकार द्या व गरम तव्यावर टाका.
अश्या सर्व टिक्की बनवून घ्या.
त्यानंतर तव्यावर झाकण ठेवून गॅस मंद करा व १ मिनिट
झाकण राहू द्या.
झाकण काढल्यावर गॅस मंद आचेवच राहू द्या.
आवश्यकता
वाटल्यास टिक्कीच्या बाजूने थोडे तेल टाकावे.
संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
एक बाजू सोनेरी रंगाची
झाल्यावर परतवून घ्या.
दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंग आला कि तयार आहे आपली
कुरकुरीत गरमागरम उपवासाची आलू टिक्की .
एका वाटीत दही घेऊन त्यात साखर व चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करा व वरून जिरे पूड टाकून घ्या.
तयार टिक्की या दह्यासोबत सर्व्ह करा.
Comments
Post a Comment