उपवासाला चालेल असा वेगळया पदार्थांच्या आपण नेहमीच शोधात असतो. एका पदार्थाचा वापर करून अनेक नवीन उपवास पदार्थ तयार करता येतात तो म्हणजे भाजणी. चला नेहमीच्याच भगर (वरई) व साबुदाणाला नवीन रूप देऊया.उपवासाची सात्विक अशी भाजणी करूया.
साहित्य:
- १ कप भगर
- १/४ कप साबुदाणा
कृती:
- सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवून गॅस मंद आचेवर सुरु करा.
- भगर, साबुदाणा मंद आचेवर एक एक करून प्रत्येकी १० ते १२ मिनिटे भाजून घ्या.
- मी येथे बारीक साबुदाणा वापरला आहे. जाड किंवा बारीक साबुदाण्याचा भाजणीवर काहीही फरक पडत नाही.
- लवकर थंड होण्यासाठी ताटात पसरवून ठेवा.
- दोन्ही साहित्य थंड झाले एक मिक्सर ला जाडसर रवाळ बारीक करून घ्या.
- तयार पीठ हवाबंद डब्यात भरून ठेवा.
- हे पीठ वरील प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार (कमी / जास्त) तुम्ही अगोदरच तयार करून ठेवल्यास ऐनवेळेस चटकन वापरू शकता.
संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
* वरील पिठापासून तयार केलेले उपवास पदार्थ पुढील ब्लॉग मध्ये शेअर करेल.




Comments
Post a Comment