What would be a good fast recipe with Ashadhi ekadashi just round the corner. with lockdown still on, and with everyone at home fasting would surely become feasting. And surely there would be demand for variety of fasting recipes. With that in mind we should make some dishes to be ready for fasting day. so, lets try one such recipe which you can make today and enjoy on ekadashi. ( PS. Its your responsibility to keep this safe till ekadashi 😉😉)
साहित्य :
- २ कप खोबरा किस
- १ कप दूध
- १/२ कप साखर (आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता )
- २ चमचे दूध पावडर
- १ छोटा चमचा विलायची पावडर
- चिमूटभर जायफळ पावडर
- १० ते १२ चमचे खोबरा किस सजावटी साठी
- रंग (food colour आवडत असल्यास)
Ingredients:
- 2 cup dried desiccated coconut
- 1 cup milk
- 1/2 cup sugar (as per your taste)
- 2 spoon milk powder
- 1 teaspoon cardamom powder
- Pinch of nutmeg powder
- 10-12 spoon coconut powder for garnishing
- food colouring (as per your choice)
कृती :
सर्व प्रथम कढईत खोबरा किस मंद आचेवर २-३ मिनिटे भाजून घ्या. नंतर त्यात दूध टाकून चांगले एकत्र करून आणखी २ ते ३मिनिट परतवत रहा. दूध पूर्णतः शोषले गेले तर त्यात दूध पावडर व साखर टाका व सतत परतवत राहा . गॅस मंद ते मध्यम केला तरी चालेल पण परतवत रहा .मिश्रण हलकंस सोनेरी होईल व त्याला घट्टपणा येईल .काही वेळानी मिश्रण कढई सोडून एकत्र गोळा बनेल.त्यात विलायची पावडर व जायफळ पावडर टाकून घ्यावी. थोडे मिश्रण एका प्लेट मध्ये घेऊन थंड करून लाडू वळतोय का बघा.गॅस बंद करून तयार मिश्रण थोडे कोमट असताना लाडू वळावे . एक प्लेट मध्ये खोबरा किस घेऊन तयार लाडू त्यात गोलाकार फिरवून घ्यावा जेणेकरून लाडू वर आवरण होईल.आवडत असल्यास थोडा तुमच्या आवडीचा रंग घेऊन तयार मिश्रणात टाकून तुम्ही छान वेगवेगळ्या रंगाचे लाडू सुद्धा वळू शकता. मिश्रणाच्या थोडा भाग घेऊन मी लाल रंगाचा वापर करून ४ ते ५ लाडू वळले. हे लाडू हवाबंद डब्यात ठेवावे. fridge मध्ये ठेवल्यास ८ ते १० दिवस टिकतात.



Comments
Post a Comment