तिळाची चटणी - Sesame Chutney



तीळ म्हटलं कि प्रथम आठवते संक्रांती, तिळाचे लाडूपासून ते रेवडी आणि तीळ-गूळ चिक्की.
तीळामध्ये असणारे फायबर आणि मॅग्नेशियम इन्सुलिन आणि ग्लूकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. प्रमाणात सेवन केल्याने हिरड्यांना बळकट ठेवण्यासोबतच शरीराची पचन क्रिया देखील सुधारते.
चला तर अश्या पौष्टिक तिळाची खमंग अशी चटणी कशी करायची ते बघुया.


Sankranti is the first thing you remember on the mention of Sesame seeds, and you would remember savoring delicacies from sesame laddu to revadi and sesame-jaggery chikki.
The fiber and magnesium in sesame seeds help control insulin and glucose levels. Consumption in moderation not only strengthens the gums but also improves the digestion of the body.
Let's see how to make such a nutritious sesame chutney.


साहित्य :
  • १/२ कप तीळ
  • २  सुक्या मिरच्या किंवा १ चमचा  लाल तिखट (तिखटपणा आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता)
  • १ छोटा चमचा जिरे
  •  मीठ चवीनुसार

Ingredients :
  • 1/2 cup sesame seeds
  • 2 dried chillies or 1 tsp red chili powder
  • 1 tsp cumin seeds
  • Salt to taste

कृती :

सर्वप्रथम तीळ स्वच्छ करून कढईत मंद आचेवर भाजून घ्या .तीळ तडतडून सोनेरी झाले की ते एका प्लेट मध्ये थंड होण्यासाठी काढून घ्या. गॅस बंद केल्यावरही कढई गरम असल्याने त्यातच जिरे टाकून थोडं भाजून घ्या. संपूर्ण साहित्य गार झाल्यावर तीळ आणि जिरे मिक्सरच्या भांड्यात ओतून त्यात तिखट, मीठ टाकून जाडसर बारीक करा. सर्व एकजीव झाले का पहा.खूप बारीक करू नये.
तयार झाली आपली साधी सोपी खमंग, पौष्टिक तीळाची चटणी. ही कोरडी तयार चटणी हवाबंद डब्यात भरून ठेवा. चवीला उत्तम व ताटाची शोभा वाढवणारी अशी हि चटणी १ ते २ महिने टिकते.चपाती, पराठा आणि भाकरी सोबत खूप छान लागते.


Recipe :

First clean the sesame seeds and roast them in a pan over low heat till they turn golden. Transfer seeds in a plate and let it cool. Use the hot pan to lightly roast cumin seeds and allow it to cool.
Once the seeds are completely cold, mix all the ingredients in grinder jar and grind them to coarse consistency. Make sure that the mixture is not made too fine.
Your simple, nutritious sesame chutney is ready. Store this dry chutney in an airtight container. This chutney lasts for 1 to 2 months. It goes well with chapatis, parathas and breads.

Comments