उपवासाची इडली......हो बरोबर वाचलं तुम्ही. इडलीच म्हटलं मी. उपवासाला चालेल असा वेगळा पदार्थ. उपवासाच्या दिवसात पचायला हलकं पदार्थांच्या आपण शोधात असतो. बऱ्याच वेळा तेच तेच पदार्थ नको वाटतं त्यामुळे नेहमीच्याच भगर (वरई) व साबुदाणाला नवीन रूप देऊन आज मी घेऊन आली आहे. चला तर बघूया कशी करायची उपवासाची इडली आणि चटणी.
साहित्य:
इडलीसाठी:
चटणीसाठी:
- १/२ कप उपवासाचे पीठ
- १/२ कप दही
- १/४ छोटा चमचा खायचा सोडा
- मीठ चवीनुसार
- पाणी
*उपवासाचे पीठ - हे कसे तयार करायचे ते आपण या आधी रेसिपी मध्ये बघितलं आहे त्याची लिंक सोबत देत आहे.
- १/४ कप ओले नारळाचे काप किंवा २ चमचे खोबरा किस
- २ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
- २ हिरवी मिरची
- १/२ छोटा चमचा साखर
- मीठ चवीनुसार
- १/४ छोटा चमचे जिरे
- १ चमचा तेल
- १ लाल सुकी मिरची ( आवडत असल्यास )
- पाणी
कृती:
इडली:
एक भांड्यात १/२ कप पीठ ,१/२ कप दही एकत्र भिजवून घ्या.
एक भांड्यात १/२ कप पीठ ,१/२ कप दही एकत्र भिजवून घ्या.
तयार मिश्रण झाकून १५ ते २० मिनिट ( थंड वातावरणात २० मिनिट आणखी) ठेवावे.
मिश्रण खूप घट्ट होईल.
नंतर त्यात खायचा सोडा टाकून एकाच दिशेने फिरवत हलकंसं मिक्स करा व तयार मिश्रण पात्रात ओतून घ्या.
इडली करण्यासाठी इडलीच्या साच्याला तेल लावा.
इडली पात्रामध्ये थोडं पाणी टाकून मध्यम आचेवर गॅस सुरु करावा.
पात्र stand मध्ये ठेवा. १५ ते २० मिनिट मध्यम आचेवर होऊ द्या .
गॅस बंदकेल्यावर ५ मिनिट पात्र स्टॅन्ड मध्येच राहू द्या.
नंतर बाहेर काढून पूर्ण थंड होऊ द्या.
चटणी :
शेंगदाणा कूट, खोबर, हिरवी मिरची ( तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता), साखर ,मीठ चवीनुसार मिक्सर च्या भांड्यात ओतून बारीक करून घ्या.
आवश्यकतेनुसार पाणी टाकून थोडे पातळ करून घ्या.
तयार चटणी छोट्या भांड्यात काढून घ्या.
तेल गरम करून त्यात जिरे टाका.
जिरे तडतडलं कि ते चटणीवर फोडणी करा.
संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Comments
Post a Comment