आज ची अशी कशी ही एकादशी ।
पांडुरंग भक्तांच्या भेटी विना राहिला उपाशी ।।1।।
भक्ता सारखाच तोही असतो आतुर भेटीला ।
पण कोरोनानी तर सर्वांनाच धरले आहे वेठीला ।।2।।
गावोगावी नव्हती रस्त्यावर सडा,रांगोळी ना वारी ।
तूच पांडुरंगा आम्हाला या संकटातून तारी ।।3।।
ना मानाचा घोडा ना होती पालखी संतांची ।
ना गंध,बुक्का ना झाली वर्षा फुलांची ।।4।।
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नाही जयघोष दुमदुमला ।
पंढरपूरात तर आज पांडुरंग ही नाही रमला ।।5।।
नाही चंद्रभागेत स्नान ना झाले रींगण ।
आठवणीत वारीच्या दुःखी झाले भक्तगण ।।6।।
मीच येईल तुझ्या भेटीला बोलला पांडुरंग ।
वारीची परंपरा पडायला नको ना भंग ।।7।।
दरवर्षी तर तूच येतो ना सर्व मागे सोडून ।
यावर्षी नको निघू घराबाहेर बंधने तोडून ।।8।।
पुढे होईल सुरळीत सगळं तेव्हा कर वारी ।
तुझ्यासाठी मी इथेच आहे उभा विटेवरी ।।9।।
मनातच कर पांडुरंग हरी चा गजर ।
तिथेच असेल तुझा विठ्ठल हजर ।।10।।
Khup sunder bhumika....
ReplyDeleteMasst zali kavita..Badiya👌
ReplyDeleteBhumika ...amazing.
ReplyDeleteThank you 😊
DeleteYogita.....no words my dear.... Bht sundar likha h... Hats off to u
ReplyDeleteThank you dear😊
DeleteWow....khup ch sundar ..bhumika mast lihil ahes
ReplyDeleteThank you🤗
Deleteखूप सुदंर,👌 आठवणीत आहे अजून हि तुझी साथ माऊली आणि तुकाराम महाराज च्या पालकीची बगत होतो आतुरतेने वाट, आणि तू केली होती प्रार्थना होउदे माझया मैत्रिणीला एक बाळ,👍
ReplyDeleteधन्यवाद😇
Deleteहो मी पण नाही विसरली
🙏 जय हरी विठ्ठल 🙏
खरेच खूप छान शब्दात मांडले आहे वास्तव.पहिल्यांदा घडते आहे पायी वारीत खंड.
ReplyDeleteधन्यवाद सर🙏
DeleteKhupach Sundar
ReplyDeleteThank you😊
Delete