पालक ही सर्व पालेभाज्यांमध्ये सर्वश्रेष्ठ भाजी आहे.पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आहारात खूपच महत्त्वाची आहे.
पालकाची हिरवी जुडी बाजारात पहिली कि घेतल्या जातेच.परंतु अश्या ह्या पालकाला एकाच रूपात दिल्यास ते जरा आजकाल मुलांना नको वाटतं. चला तर अश्या या पालकाचा एक नवीन पदार्थ आज आपण करूया तो म्हणजे पालक वडी.Spinach is the best of all leafy vegetables. Spinach is rich in iron, calcium, phosphorus as well as amino acids, proteins, minerals, moisture, fiber and starch, vitamins A, B and C, folic acid. Due to all these properties, spinach is very important vegetable in diet.
Green leafy,fresh spinach is the thing we generally always buy from market. However, children generally don't like being served the same dish every time. So Let's see a new recipe using spinach.
साहित्य :
- १००-१५० ग्रँम पालक
- १/४ कप बेसन
- १/४ कप तांदुळाचे पीठ
- १/४ कप ज्वारीचे पीठ
- २ छोटे चमचे तिखट
- १ छोटा चमचा हळद
- १ १/२ छोटा चमचा तीळ
- १/२ छोटा चमचा जिरे
- १/२ छोटा चमचा ओवा
- १/२ चमचा मोहरी
- १ चमचा तेल
- चिमूठभर हिंग
- मीठ
- पाणी
Ingredients :
- 100-150 gms of spinach
- 1/4 cup gram flour
- 1/4 cup rice flour
- 1/4 cup sorghum flour
- 2 teaspoon red chilli powder
- 1 teaspoon turmeric
- 1 1/2 teaspoon sesame seeds
- 1/2 teaspoon cumin seeds
- 1/2 teaspoon carom seeds
- 1/2 tsp mustard seed
- 1 tbsp oil
- A pinch of asafoetida
- Salt
- Water
कृती :
सर्वप्रथम पालक स्वच्छ करून बारीक चिरून एका भांड्यात / परातीत टाका. त्यानंतर त्यात सर्व पीठे ,तिखट ,हळद,मीठ,हिंग,१ छोटा चमचा तीळ,जिरे,ओवा टाकून आवश्यक असल्यास पाणी टाकून गोळा मळून घ्या. तयार गोळा १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.
आता तयार मिश्रणाचे ३ ते ४ सामान भाग करून त्याचे गोलाकार रोल बनवा. कूकरच्या भांड्याला तेल लावून तयार रोल त्यात ठेवा व ते कुकरला शिट्टी न लावता साधारण १५-२० मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. तयार रोल पूर्ण थंड झाल्यावर त्याचे काप करून घ्या.
तव्यावर तेल टाकून त्यात मोहरी, १/२ छोटा चमचा तीळ टाका .दोन्ही तडतडायला लागले कि त्यावर तयार काप पसरवून ठेवा . मंद आचेवर दोन्ही साईडने खमंग सोनेरी रंगावर काप परतवून घ्या. अश्याप्रकारे तयार गरमागरम खमंग पालक वडी सर्व्ह करा.लहान मुले खूप आवडीने खातात. कमी तेलात झालेला हा पौष्टीक पदार्थ नक्की करून बघा.Recipe :
Now divide the prepared dough into 3 to 4 equal parts and make cylindrical rolls. Take a cooker pot and grease it with oil .Place the prepared rolls in the cooker pot and steam it in pressure cooker on medium heat for about 15-20 minutes without restraint.
Take out the pot and allow the rolls to completely cool down. Then slice the rolls in small circular shapes.
Pour oil on pan and add mustard seeds and 1/2 tsp sesame seeds and allow them to crackle. On a low flame, saute the slices on both sides until golden brown. Your crispy Spinach Fritters are ready. Serve hot. Young children would love this dish. Please try this low-fat, nutritious dish.
Comments
Post a Comment