स्वप्नांच्या दुनियेत नेणारी सुंदर भावना म्हणजे प्रेम । खरोखरच प्रत्येकाचे असते काहो हे सेम ।।1।। प्रत्येक दिवसाला बनवा प्रेमाचा दिवस । स्वतः वरही प्रेम करून तू स्वतःला गवस ।।2।। प्रेम हा मनातून निर्मळ व सोज्वळ वाहणारा झरा । प्रेमाचा कर लाभलेल्या सुंदर आयुष्यावर प्रेम करून भरा ।। 3।। विश्वास व समुजतदारपणाने होते यात वाढ । रंग,रूप व पैसा हे येत नाही कधी यात आड ।।4।। आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नात्यात ते फुलते । वाऱ्यासंगे झाडावरचे फुलं जसे झुलते ।।5।। पावसात चिंब होऊन आनंदाने भिजणं । मातीत बीज अंकुरण्यासाठी जसं रुजणं ।।6।। सागराला मिळण्यासाठी नदीची ओढ । सुख:दुःखात असावी एकमेकांना आधाराची जोड ।।7।। चांदण्या रात्री जसे चमकतात आकाशात तारे । न सांगताच उमगू लागतात सारे इशारे ।।8।। काळोखाच्या वाटेवर असावी एक अबोल साथ । आयुष्याच्या वळणावर शेवटपर्यंत देऊन हातात हात ।।9।। तुझं माझं पासून आपलं पर्यंत बनविणारा हा साचा । म्हणूनच व्यक्त करायला नेमलाय खास एक दिवस प्रेमाचा ।।10।।
- Get link
- X
- Other Apps